जोतिबा फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करणार; काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांचे प्रतिपादन

Foto

औरंगाबाद: क्रांतीसूर्य जोतिबा फुले यांनी सत्‍यशोधक समाजाची स्‍थापना केली. या माध्यमातून त्‍यांनी शेतकरी आणि बहुजन वर्गाला डोळ्यासमोर ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्‍त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्‍यांनी रोवली. जोतिबा फुले हे आदर्श असून त्‍यांच्‍या प्रेरणेने सातत्‍याने काम करणार, असे प्रतिपादन काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांनी केले. ते नाचनवेल (ता. कन्नड) येथे आयोजित प्रचार सभेत शुक्रवारी (ता. ११) बोलत होते.

पुढे बोलतांना श्री. झांबड म्‍हणाले, की शेतकरी, स्‍त्री शिक्षण आणि बहुजन वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम जोतिबा फुले यांनी केले. एक लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक म्‍हणून ते प्रसिद्ध आहेत. आपल्‍या साहित्‍यातून समाजप्रबोधनाचे काम केले. त्‍याशिवाय बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी सातत्‍याने प्रयत्‍न केले. ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ शिक्षणाचे महत्त्व त्‍यांच्‍या या ओळीमधून आधोरेखित होते.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस मिञपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाषभाऊ झांबड यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारानिमीत्त आज नाचनवेल येथे प्रचारसभा व पदयाञा संपन्न झाली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी रस्ते, पाणी, अपूरे दळणवळण, शिक्षण, दुष्काळी परिस्थिती यासह अनेक समस्या प्रस्थापित सरकारच्या विरोधात मांडल्या. यादरम्‍यान चिंचोली, घाटशेंद्री, नेवपुर, चिमणापूर, वासडी आणि अंधानेर येथे सुभाष झांबड यांनी प्रचारसभा, भेटीगाठी आणि कॉर्नर बैठका झाल्‍या.

यावेळी शहराध्यक्ष नामदेवराव पवार, ॲड. प्रसन्ना पाटील, संतोष कोल्हे, बाबासाहेब मोहिते, अनिल सोनवणे, पुंडलिकराव वेताळ, डॉ. प्रकाश चव्हाण, बबनराव बनसोडे, कैलास मनगटे, रावसाहेब पवार, रामू पवार, राजेंद्र पवार, काकासाहेब जंजाळ, पांडूरंग पवार, सचिन पवार  यांच्यासह चिंचोली सर्कल मधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.